वडिलांचे स्वप्न केले पूर्ण : माळेगांवच्या अनिताची पोलिस दलात निवड …!

 Success Story of a farmers girl anita chaudhari being Police:  नमस्कार मित्रांनो आज आपण आजची बातमी या मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या सर्वच विद्यार्थी, शेतकरी, उदयोजक मित्रांसाठी एक SUCCESS STORY घेऊन आलेलो आहे, या मधून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल, त्यासाठी ही खालील पोस्ट संपूर्ण वाचा.

   पोलिस, सैन्यदलात भरती होण्यासाठी लाखो मुले मुली तयारी करतात. अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. असेच यश माळेगांव, ता.बदनापूर, जि. जालना येथील अनिता नारायण चौधरी हिने संपादित केले आहे.

    प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनिता हिने पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत अकोला जिल्हा पोलिस दलात भरती होत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या यशामुळे तिच्यावर ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

anita chaudhary police

    म्हारी छोरीया छोरों से कम है के” हा दंगल चित्रपटांमधील आमिर खानने म्हणलेला डायलॉग हुबेहूब नारायण चौधरी यांच्या प्रती खरा होतो . कारण चौधरी यांना एकूण सहा मुली असून त्यांना एकही मुलगा नाही. पण त्यांच्या मुलींनी त्यांना मुलाची उणीव भासू न देता जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर येवठे मोठे यश मिळवून दिले आहे.चौधरी यांची घरची परिस्थिती प्रतिकूल असताना देखील आपल्या मुलींनी शिक्षण पूर्ण करत सरकारी नोकरी करावी असे स्वप्न उराशी बाळगले. यासाठी त्यांनी अनीताला पोलिस भरतीसाठी पाठवले. मुलीने पोलिस भरतीची तयारी करणे तितके सोपे नव्हते.

  अनीता हिने देखील वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करत प्रयत्न सुरु केले सर्व अडचणींवर मात करून यशाला कवेत घेत वडिलांचे स्वप्न अनीता हिने पूर्ण केले.

अनीता हिचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले .ना घरात कोणी शिकलेलं ना कसलाच शैक्षणिक वारसा.. घर तस शेतात.. गावापासून २ किलोमीटर दूर. दररोज दोन किलोमीटरची पायपीठ करून ती पण ओढ नाल्यातील पायवाट .. काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत गावातील शाळेत अनीता आणि तिची बहीण शाळेत जायच्या. ग्रामीण भागातील प्रथा नुसार मोठ्या बहिणींची वयाच्या १७ -१८ व्या वर्षी बापाने लग्न लावून दिले. त्यानंतर अनिता आणि सगळ्यात धाकटी सुनिता यांनी कधी बापाला मुलाची उणीव भासू दिली नाही.. दररोज न चुकता शाळेत जायच्या. शाळेपासूनच दोन्ही बहिणी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायच्या . शाळेतून गेल्यावर शेतात आई-वडिलाला शेतकामात मदत करायची .. हातात येईल ते काम करत गेल्या. मोटर सायकल चालवण.. ट्रॅक्टर चालवण.. हा देखील याच कामाचा एक भाग आहे.. प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण झाल्यावर… शेजारच्या गावी ७ किलोमीटर जावं लागायचं. असं करीत मॅट्रिक्स शिक्षण पूर्ण झाल. आणि नंतर सुरू झाला तो घरापासून दूर राहण्याचा प्रवास . या प्रवासात तिने स्पेशल फोर्स करिअर अकॅडमी जॉईन केली, तिची मेहनत आणि नवनाथ राठोड सरांचे मार्गदर्शनाने थोड्याच दिवसात यशाच्या शिखर गाठले . प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत , प्रतिकूल परिस्थितीवर मात करत , मोठ्या जिद्दीने दोघी बहिणी शिकल्या , सुनिता आज CMA करत आहे.अनिता आज पोलीस दलात भरती झाली.

anita chaudhary police

आजची बातमी या मराठी न्यूज पोर्टल कडून अनिता हिच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम ….! 

अशाच नवनवीन पोस्ट बघण्यासाठी आजची बातमी च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन व्हा….! 

स्पेशल फोर्स करिअर अकॅडमी संभाजीनगर .. योग्य मार्गदर्शन आणि नियमित सराव .. महाराष्ट्रात सर्वात कमी वेळेत सर्वाधिक रिझल्ट देणारी नं १ संस्था ..8308420565 / 8552057798 )

1 thought on “वडिलांचे स्वप्न केले पूर्ण : माळेगांवच्या अनिताची पोलिस दलात निवड …!”

Leave a Comment