Poonam Pandey Breking: मृत्युची बातमी म्हणजे नुसता Publicity Stunt काड्या करणारी पूनम अशी का वागते ?

Poonam Pandey latest publicity stunt death message

Poonam Pandey breking death publicity stunt :- पुनम पांडेच्या Official Instagram Account वर शुक्रवारी 2 फेब्रुवारीला पूनमचा सर्विकल कॅन्सर मुळे मृत्यू झाला अशी बातमी आली.

Poonam Pandey latest publicity stunt death rakhi savant

पूनमचा मृत्यू झाला असं बाहेर आलं. तस तस लोकांनी तिला श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली. राखी सावंतला धक्का बसला. पापा राजने पूनमचे गरीब मुलांना मदत करणारे व्हिडिओ शेअर केले. पूनम पुन्हा एकदा देशातला Hot Topic झाला, पण यावेळी मृत्यूच्या बातमीमुळे. (Poonam Pandey breking death publicity stunt)

Poonam Pandey latest publicity stunt death instagram post

त्यानंतर 24 तासात पुनमने आपण जिवंत असून सर्विकल कॅन्सर बद्दल लोकांमध्ये जागृती करण्यासाठी हे कॅम्पियन केलं असं सांगितलं. इतक्या वेळेस श्रद्धांजली वाहणारे लोक माप काढायला लागले आणि पूनम पांडे ने पुन्हा एकदा पब्लिसिटी स्टंट हिट केला. विषय फक्त मरून जिवंत होऊन लेडी अंडरटेकर बनायचं नाही. (Poonam Pandey breking death publicity stunt)

पूनमचा आतापर्यंतच वागणं बघितलं तर एक प्रश्न पडतो, पुनम पांडे अशी का वागते ? याच प्रश्नाचे उत्तर देणारा हा ब्लॉग आहे.

पुनम पांडे मूवी

नमस्कार मित्रांनो, आजची बातमी मध्ये तुमचे स्वागत आहे. पुनम पांडेच नाव दिसल्यावर सगळ्यात आधी 2013 च वर्ष आठवलं. नुकतीच दहावी झालेली, सुट्ट्या लागलेल्या, आपला दिवस जायचा सायबर कॅफेत. आता CS आणि GTA-YCT मुळे सायबर कॅफेचा नाद लागला. असं किती म्हणलं, तर आपण तिथे जाऊन काय काय उद्योग केले, हे आपल्याला आणि सायबर कॅफे वाल्यालाच माहीत. आमच्या सायबर कॅफे वाल्यान एकदा एका पिक्चर चा ट्रेलर दाखवला. पिक्चरचं नाव होतं नशा. (Poonam Pandey breking death publicity stunt)

Poonam Pandey latest publicity stunt death nasha movie heroin

ट्रेलर मधन काय स्टोरी समजली, अजूनही आठवत नाही. पण हा, एक व्यक्ती मात्र फिक्स आठवते, पूनम पांडे. नशा पिक्चरची हिरोईन.

Poonam Pandey latest publicity stunt death modeling photos

2011 च्या वर्ल्ड कप फायनल नंतर सचिन रिटायर होणार का ?, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न पूनम पांडे नेमकं काय करणार ? हा होता. कारण पूनम पांडे काहीही करू शकते, हे डोक्यात फिट बसलेल.

पूनम पांडेचा इतिहास

कानपूरच्या एका ब्राह्मण कुटुंबात पूनमचा जन्म झाला. घरातल वातावरण धार्मिक, त्यामुळे पोरींन मॉडेल, वगैरे होण्याला घरच्यांचा विरोध होता. पण हीन मॉडेल व्हायचंच असं ठरवलं. मॉडेल हंट जिंकले. नव्या नव्या रियालिटी शोज कॅलेंडर मध्ये दिसायला लागले.

Poonam Pandey latest publicity stunt death modeling

वयाच्या 18-19 व्या वर्षी मॉडलिंग मध्ये करिअरची सुरुवात करून, चांगलं यशही मिळवलं. फॅशन नावाच्या मॅक्झिनच्या कव्हर वर आली. तेव्हा लई जणांच्या बत्या गुल केल्या.

मॉडेलिंग नंतर नंबर होता बॉलिवूडचा. तिचा पहिला पिक्चर होता नशा. त्यात विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यात रिलेशन असल्याचं दाखवलं.

Poonam Pandey latest publicity stunt death nasha movie

पूनम पांडेला Acting जमले नाही, पण चर्चेत राहणं मात्र जमल. नशाच्या पोस्टरवर तिचा कपडे नसलेला look बघून, पोस्टर फाडण्यापासून जी सुरुवात झाली, ती पूनम पांडेन एक्टिंग कशी करू नये, याचे क्लासेस घ्यावे आणि जिंदगीत कधी पिक्चर करू नये, इथवर पोहोचली. आता पिक्चर पडला का चालला हा मुद्दा पडला माग. पुनम पांडेला यशाचा फॉर्मुला सापडला होता, चर्चेत राहणं. (Poonam Pandey breking death publicity stunt)

Poonam Pandey latest publicity stunt death world cup 2011

2011 ला टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वानखेडे स्टेडियम वर निर्वस्त्र फिरेन, 2012 ला कोलकात्याने आयपीएल जिंकली तर निर्वस्त्र होईल. अशी स्टेटमेंट करून तिने खडा मारून पाहिलेला, पण हा चर्चेत राहण्याचा फॉर्मुला हिट करण्याचा तिने ठरवलं, त्यातूनच पुढे आला पूनम पांडे पॅटर्न. ज्यामुळेच आपल्याला प्रश्न पडलाय – पूनम पांडे अशी का वागते ?

पूनम पांडे अशी का वागते ?

आता कुठ आलो मेन मुद्द्यावर, तर कशी वागते आणि का वागते हे आता विस्तारांना सांगतो.

Poonam Pandey latest publicity stunt death home

पहिला विषय

पहिला विषय म्हणजे स्वतः पूनम पांडेच डोकं. पूनम काय असं सापाची टिकली लावून, तीन वेळा तोंडावर कॅमेरा आल्यावर काम करणारी विलन नव्हती. ती साबणाने लॅपटॉप धुणाऱ्या हीरोइन सारखं वागायची. पण फक्त ॲडव्हान्स व्हर्जन. म्हणजे काय तर, ती मोजक बोलणं, बोलण्यातून डाव साधन, बोल बच्चन च्या जीवावर काम मिळवणं असलं करायची नाही. तिचं डोकं चालायचं थेट गोंधळ घालण्यात आणि लक्ष वेधून घेण्यात. (Poonam Pandey breking death publicity stunt)

तिचं नाव जेव्हा इंडस्ट्री मध्ये गाजायला लागलं, तेव्हा तिने स्वतःची स्ट्रगल कहाणी सांगितली. माझे वडील आयएएस ऑफिसर आहेत. त्यांचा विरोध पत्करून मी पळून आलेत. मुंबईत स्वतःच्या पायावर उभे राहिले. आयएएस ची पोरगी मॉडेल झाली, तेही असली वाढीव, असं म्हटल्यावर मीडियात दंगा झाला. पण प्रत्यक्षात ही स्टोरी होती फेक.

Poonam Pandey latest publicity stunt death

पूनमच्या घरातले साधे लोक होते. त्यांनी पूनमची मॉडलिंग बघून तिला वाळीत टाकलं होतं. पण पूनमला वडिलांचा आजारपण सांभाळणं. गावात बंगला बांधण. अशा गोष्टी करून वातावरण नॉर्मल केलं. पण पूनम ना त्यातही फेक स्टोरी आणली, मसाला वाली.

Poonam Pandey latest publicity stunt death jursey women in blue

तिचं डोकं कसं चालतंय याबद्दल आणखी एक किस्सा सांगितला जातो. 2011 मध्ये भारतात वर्ल्डकप सुरू होता तेव्हा तिने एक फोटोशूट करायचं ठरवलं, Women In Blue या थीमवर. टीम इंडियाची जर्सी, हातात ग्लोज, अंगावर तिरंग्याचे पेंटिंग असं टिपिकल शूट तिनं केलं. हे फोटो बातम्यांमध्ये पण आलेत. पण या टिपिकल शूट मुळे आपली चर्चा होणार नाही, हे तिला माहीत होतं. किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकलेल्या पूनम पांडेला टिपिकल राहायचं नव्हतं, मग तिने एक आयडिया सुचवली. “प्लेअरच्या हेल्मेट वर तिरंगा असतो, त्याच हेल्मेटवर मी उभी राहीन आणि आपण फोटो काढू म्हणजे पूनम पांडेन तिरंग्याचा अपमान केला, म्हणून बातमी होईल आणि मी चर्चेत येईल” असा तिचा प्लॅन होता. तो तिने तिच्या मीडियातल्या काही मित्रांसोबत डिस्कस केला, पण त्यांनी विरोध केल्यामुळं तिला गप्प बसायला लागलं आणि टिपिकल फोटोशूटवर समाधान मानावं लागलं. असं चालते पूनम पांडेचे डोकं. (Poonam Pandey breking death publicity stunt)

हेही वाचा : – मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास

दुसरा विषय

आता सांगतो दुसरा विषय तिच्या आजूबाजूचे लोक आणि तिची टीम एखाद्या गोष्टीत आपलं डोकं चालत नसलं, तर आपण आपल्या दोस्ताचा सल्ला देतो. मग तो बाद सल्ला असला, तर दोघेपण बाद होतात, पण पूनमच्या आयुष्यात मात्र असं घडत नाही कारण तिने आपल्या टीम मध्ये मार्केटिंग मध्ये बादशाह असलेले लोक जाणीवपूर्वक निवडले. ही पब्लिसिटीसाठी खूंखार आयडिया देणारी लोक पुनमच डोकं जिथं थांबेल, तिथनं स्वतःचा डोकं लावतात. फोटोशूट जमलं नाही तर वानखेडे वर निर्वस्त्र फिरण्याची आयडिया, याच टीमकडून आलेली बरं पूनम पांडेने असा व्हिडिओ बनवला पण होता, तो सोशल मीडियावर टाकता आला नाही, म्हणून स्वतःचा ॲप बनवून तिथे टाकला. तिचा उद्योग बघून गुगलने ॲपच बंद केलं. मंग वेबसाईट सुरू करून त्यावर टाकला. हे सगळं डोकं तिच्या टीमचं. (Poonam Pandey breking death publicity stunt)

Poonam Pandey latest publicity stunt death the journey of karma shakti kapoor

पुढे जाऊन तिच ऑपरेशन, एरोटिक्स फिल्म मधली एन्ट्री प्रत्येक गोष्ट मोजून मापून चर्चेत आणली गेली. पण तरीही तीन-चार दिवसाची चर्चा, यापुढे घोड जात नव्हतं. बॉलीवूड मध्ये एकाच स्टाईल चे वेगवेगळे प्रयोग झाले असते, तरी तिच्या नावावर एकही हिट पिक्चर नव्हता. मग 2018 मध्ये तिच्या टीमने एक प्लॅन केला पूनमचा शक्ती कपूर सोबत द जर्नी ऑफ कर्मा नावाचा पिक्चर येणार होता. पिक्चरच्या प्रमोशनसाठी प्रेस कॉन्फरन्स होईल, तेव्हा शक्ती कपूर पूनम सोबत गैरवर्तन करेल आणि त्याची बातमी झाल्यावर पिक्चर हिट होईल. नशिबाने शक्ती कपूरच डोकं जाग्यावर होतं त्यामुळे असलं काही घडलं नाही.

Poonam Pandey latest publicity stunt death ex boyfriend

तिच्या टीमनच बजेट मधली सर्विकल कॅन्सर बद्दलची घोषणा बघून, एका कंपनीसोबत टायप केलं आणि त्यातूनच हे मरून जिवंत होण्याचं प्लॅनिंग घडून आलं. बरं पूनमची टीम म्हणजे तिच्यासोबत काम करायची माणसच, असे डोके लावायचं असही नाही. तिचा एक्स बॉयफ्रेंडही नव्या नव्या आयडिया द्यायचा. मग ते दोघांचे खाजगी व्हिडिओ शेअर करणे असेल किंवा लॉक डाऊन मध्ये लग्न करून, मारहाणीचे आरोप करून, बारा दिवसात घेतलेला डिव्होर्स असेल. सगळं काही नियोजित असायचं. (Poonam Pandey breking death publicity stunt)

तिसरा विषय

तिसरा विषय पेड मीडिया, पूनम पांडेन खतरनाक पी आर टीम सेट केली होती. तिच्याबद्दलची बातमी मग ती तिला शिव्या पडतील अशा असतील किंवा तिचं कौतुक होईल असं असेल. अगदी योग्य वेळेत योग्य मीडिया मध्ये यायची. कुठल्या मोठ्या वृत्तसंस्थेने पूनम बद्दलची बातमी केल्यावर बाकीची माध्यमे त्याची दखल घेतील, याचा प्लॅन अगदी परफेक्ट केला जायचा. पूनमच बिचवर निर्वस्त्र होऊन धावण, तिने ओन्ली फॅन्स वर अकाउंट उघडणे, यात बातमी करावा असं काही नव्हतं. तरीही बातम्या सगळ्यांनी केल्या कारण पूनम पांडेन पेड मेडिया सेट केला होता. (Poonam Pandey breking death publicity stunt)

Poonam Pandey latest publicity stunt death

2014 मध्ये पूनम पांडेन मीरा रोडवर कमी कपड्यात तमाशा केला होता. तेव्हा पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. तेव्हाही पूनमने आपल्या पोलीस खात्यातील मित्र, त्यांची मिळालेली मदत, याची बरीच चर्चा घडवून आणली होती. लॉकडाउनच्या काळात तिला नियम मोडल्याप्रकरणी अटक झाली, तेव्हा तिला पोलिसांकडून अधिकृत स्टेटमेंट आल्यानंतरही तिनं मला अटक झालीच नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली. त्याचीही बातमी झाली. (Poonam Pandey breking death publicity stunt)

हेही वाचा :- मनोज जरांगे पाटील मोबाइल नंबर, कोण आहेत ?, शिक्षण किती, कुठे राहतात ?

थोडक्यात तिचा पेड मीडिया पूनम चर्चेत येईल, अशा बातम्यांवर जोर देतो. मंग या बातम्या किंवा प्रकरण कसे दाबली जातायेत हे दाखवायला नव्या बातम्या देतो. त्यांचा हा फ्लो टिकायला, पुनमच वागणं सुरूच राहतं.

Poonam Pandey latest publicity stunt death hpd histrionic personelity disorder

चौथा विषय

चौथा विषय म्हणजे हिस्ट्रीऑनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (HPD), आता ही असते एक मेंटल कंडिशन, ज्यात एखाद्या व्यक्तीला कायम लोकांचं लक्ष आपल्याकडे हव असतं. मंग यासाठी अंग प्रदर्शन करणं, खूंखार कपडे घालणं, उगाच काहीतरी बोलन, भावनांचं एक्स्ट्रा प्रदर्शन करणं, कोणाचही बोलणं ऐकून लगेच त्याचा फरक पडणं अशा सगळ्या गोष्टी घडतात. (Poonam Pandey breking death publicity stunt)

एचपीडी चा सामना करणाऱ्या लोकांना आपल्याला असं काही होतंय आणि लोकांना याचा प्रॉब्लेम असू शकतो याचा जराही अंदाज नसतो. त्यामुळे ते कांड करत राहतात. असे सांगण्यात येते की, जगात फक्त एक टक्के लोकांनाच हा त्रास आहे. खरं तेवढं वाटत नाही पण याचा सामना करत होती की नाही हे स्पष्ट होत नसलं, तरी तिचं वागणं बघून एकत्रित कारण कुठ सापडत असतील तर ते इथं.

Poonam Pandey latest publicity stunt death media

बाकी दोन गोष्टी मान्य केल्या पाहिजेत Any Publicity Is Good Publicity हा फॉर्मुला पूनम पांडे पॅटर्न मध्ये जसा वापरला गेला, तसा कुठेच नाही. कारण पूनम पांडे पिक्चर मध्ये काम करत नाही, तिच्यापेक्षा किरकोळ इन्फ्लुएन्सर लोकांचे फॉलोवर्स जास्त आहे, तिला कुठला अवॉर्ड ही मिळत नाही आणि ती कुठल्या लय मोठ्या ब्रँडची ॲम्बेसिडरही नाही पण चर्चेत राहणं हा खेळ असला तर गोल्ड मेडलवर मात्र पूनम पांडेचे नाव लिहिलय. (Poonam Pandey breking death publicity stunt)

दुसरी गोष्ट म्हणजे कोणी कितीही माप काढू द्या, पूनम पांडे न डोकं लावून पैसाही कमवला, मग तो गावात घरच्यांना बांधून दिलेला बंगला असेल, नाहीतर अंधेरी मध्ये घेतलेलं पेंट हाऊस.

तात्पर्य

तर पूनम पांडेवर अभ्यास करून, तिच्या वागण्याची कारणे लिहून, तुम्हाला सांगायची संधी मिळाली ते फेक मृत्यूच्या तिच्या याच स्टंट मुळे.

सर्विकल कॅन्सर, त्याच्या वॅक्सिंग, उपाय, याच्या बातम्या आल्या असल्या, तरी त्यातून नक्की किती जनजागृती झाली हा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो !, त्यामुळे दोन्ही चर्चा वरची तुमची मत कमेंट मध्ये नक्की सांगा, असेच मजेदार पोस्ट बघण्यासाठी आपल्या आजची बातमीच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा…!

धन्यवाद…!

1 thought on “Poonam Pandey Breking: मृत्युची बातमी म्हणजे नुसता Publicity Stunt काड्या करणारी पूनम अशी का वागते ?”

 1. I’m grateful. I have been searching for information about this topic for a while, and yours is the best that I have discovered thus far. However, what about the revenue? Regarding the supply, are you sure?

  Reply

Leave a Comment