पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र नवीन अर्ज सुरू असा करा ऑनलाईन अर्ज | Pipe Line Yojana Maharashtra 2024 in Marathi

              शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कोरडवाहू शेती न करता सिंचनाची शेती करून जास्तीत जास्त पीक घ्यावे व स्वतः समृद्ध व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र राबविण्यात येत आहे. या Pipe Line Yojana Maharashtra अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पाईपलाईन योजना संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

          Pipe Line Scheme Maharashtra अंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी अर्ज मागवून अनुदान वितरण करीत आहेत. या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार आहे तसेच अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेऊया. Pipe Line Scheme ही आपल्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे सरकारचे लक्षांक आहे.

पाईपलाईन योजना अंतर्गत अनुदान – Pipeline Anudan Yojana Maharashtra 2024

          शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पाईपलाईन योजना Pipe Line Yojana Maharashtra अंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याकरिता 50 टक्के अनुदान देण्यात येते.

पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत वितरित करण्यात येणारे अनुदान हे 50 टक्के तसेच जास्तीत जास्त 15 हजार रुपये पर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकरी पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज करून 50 टक्के अनुदान मिळवू शकतात.

पाईपलाईन अनुदान योजना लाभ कुणाला मिळणार – Pipelne Anudan Yojana Eligibility ?

      पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र 2024(pipeline anudan Yojana Maharashtra 2024) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर विहिरीची नोंद आहे किंवा इतर कोणत्याही सिंचन स्त्रोतांची नोंद आहेत जसे की शेततळे, विहीर किंवा इतर सिंचन पद्धती इत्यादी. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांना पाईपलाईन करिता अनुदान वितरित करण्यात येणार आहे. पाईपलाईन करिता सिंचन स्त्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पाईपलाईन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया

     शेतकरी मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रकारे करायचा आहे. पाईपलाइन योजना(pipeline yojana maharashtra)अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर करायचा आहे. पाईपलाईन करिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येईल व त्यांना एसएमएस प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात. कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे.

पाईप लाईन अनुदान योजना अर्ज सुरू , आत्ताच अर्ज करा 

पाईपलाईन योजना आवश्यक कागदपत्रे -Required Documents for Pipeline Scheme

या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. सातबारा उतारा व आठ अ
  2. बँक पासबुक
  3. आधार कार्ड
  4. आधार कार्ड बँकेसोबत लिंक असावे
  5. पाणी उपलब्धतेची प्रमाणपत्र
  6. पाईप खरेदी केल्याची बिल

हेही वाचा :- इतर महाराष्ट्र सरकारी योजना

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – Pipeline Yojana maharashtra onlone Process 

     शेतकरी मित्रांनो पाईपलाईन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला खालील प्रकारे प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून खालील दिलेल्या स्टेप प्रमाणे अर्ज करावा.

  1. सर्वप्रथम गुगल वर जाऊन महाडीबीटी फार्मर असे टाईप करून सर्च करा.
  2. आता आपल्यासमोर महाडीबीटी शेतकरी पोर्टलची एक अधिकृत वेबसाईट आलेली असेल त्या वेबसाईटला ओपन करा.
  3. या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  4. तुम्ही तुमची वैयक्तिक बेसिक माहिती टाकून तसेच एक युजरनेम आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करून घ्या.
  5. आता तुम्ही या वेबसाईटवर लॉगिन करा आणि अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून सिंचन साधने व सुविधा ही बाब त्या ठिकाणी निवडा.
  6. आता वरील पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पाईप संच किंवा पाईप लाईन असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  7. आता तुमच्यासमोर पाईपलाईन अनुदान योजना अंतर्गत करावयाचा अर्ज ओपन झालेला आहे, त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.

अशाप्रकारे आपण पाईपलाईन योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतो.

       पाईपलाईन अनुदान योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल, ही माहिती सर्व शेतकऱ्यांना शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा

Leave a Comment