मराठा समजाच्या सर्वेक्षणाला अखेर मुहूर्त, 23 ते 31 जानेवारी दरम्यान घरोघरी

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, 23 जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने (Maharashtra State Backward Classes Commission) याबाबत माहिती दिली आहे. 23 जानेवारीपासून सुरु होणारे हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत संपण्याच्या सूचना देखील राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे. 

23 जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण आदेश मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 20 जानेवारीला जिल्हाधिकार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यानंतर वार्ड व तालुका या ठिकाणी हे अधिकारी 20 आणि 21 तारखेला प्रशिक्षण देतील. हे सर्वेक्षण 23 जानेवारीला सुरू करून 31 जानेवारीपर्यंत हे संपण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना आहेत. तसेच, हे सर्वेक्षण करत असताना सॉफ्टवेअर कसं वापरायचं या संदर्भात तीन दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल जाणार आहेत. सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून काम करणार असल्याचे देखील आदेशात म्हटले आहेत.

सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे…

याबाबत मागासवर्ग आयोगाच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, “महाराष्ट्र शासनाकडील 13 नोव्हेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. त्याअनुषंगाने राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे,”असे या पत्रात म्हटले आहे.

असे असणार मराठा सर्वेक्षण…

  • 20 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ़्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.
  • 21 व 22 जानेवारी 2024 रोजी वॉर्ड व तालुक्याचे प्रशिक्षक संबंधीत तालुक्याच्या, वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील-वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील.
  • 23 जानेवारी 2024 पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होईल. हे सर्वेक्षण 31 जानेवारी 2024 पुर्वी पुर्ण करावयाचे आहे.
  • या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फ़त ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेला आजपासून प्रत्यक्षात सुरुवात

📣 राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून राज्यभरात मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करावे असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

👥 मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिशन सर्वेक्षण मोहिम राबिण्यात येत आहे. ही मोही 23 ते 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून राज्यातील संपूर्ण ३६ जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 अर्ध सैनिक वसाहती (कॅन्टॉन्मेंट बोर्ड) यामध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

👨🏻‍💼 या सर्वेक्षणाची जबाबदारी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच त्यासाठी लागणारे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आले आहे. ही मोहिम पूर्णपणे डिजिटल स्वरुपात करण्यात येणार आहे. त्यामुले या सर्वेक्षणाचा डेटा रिअर टाइम अपडेट होणार आहे. यासाठी राज्यभरातील एकूण 1 लाख 25 हजार पेक्षा अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रगणक आणि पर्यवेक्षक गावागावात घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करणार आहेत.

🖨️ प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मदत कक्ष आणि जिल्ह्याच्या ठिकाणी डॅश बोर्डच्या माध्यमातून जिल्हाधिकारी या सर्वेक्षणावर लक्ष ठेऊन असणार आहेत. तसेच अचूक नोंदी आणि आकडेवारी राज्य मागासवर्ग आयोगाच्या तज्ञांमार्फत वेळोवेळी तपासल्या जाणार आहेत. यासोबतच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरु केल्यापासून महसूल विभाामार्फत 28 ऑक्टोबर ते 17 जानेवारीपर्यंत 57 लाख नोंदी शोधण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 50 हजार कुणबी दाखले आतापर्यंत वितरित करण्यात आल्याची माहिती देखील मंत्री विखे पाटील यांनी दिली.

3 thoughts on “मराठा समजाच्या सर्वेक्षणाला अखेर मुहूर्त, 23 ते 31 जानेवारी दरम्यान घरोघरी”

  1. It was great seeing how much work you put into it. The picture is nice, and your writing style is stylish, but you seem to be worrying that you should be presenting the next article. I’ll almost certainly be back to read more of your work if you take care of this hike.

    Reply

Leave a Comment