सर्वात मोठी बातमी! सगेसोयरे शब्दाबाबतचा ‘मसुदा’ आजची बातमीच्या हाती; पाहा संपूर्ण मुद्दे…

Maratha reservation draft manoj jarange patil bachchu kadu : मनोज जरांगे आणि सरकारमधील सगेसोयरे शब्दावरून गेल्या काही दिवसांपासून होत असलेला काथ्याकुट समाप्त होण्याची चिन्ह दिसत आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यामार्फत मनोज जरांगे यांना दिलेल्या कच्या मसुद्यात काही बदल करून आज किंवा उद्या कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, जरांगे यांनी सरकारला अध्यादेशासंबंधी काही बदल सुचवले आहेत. तर, अध्यादेशातील कच्चा मसुदा आणि मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या बदलाची माहिती खालीलप्रमाणे…

सरकारने दिलेला अंतिम मसुदा असा होता…

➢ कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सग्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे पुरावा उपलब्ध करून दिल्यास, तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

➢ कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्य अंतर्गत झालेल्या स्वजातीय विवाहतून तयार झालेल्या सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र, या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सोहजाती आहे. या संदर्भातील पुरावा देणे तथागृह चौकशीत अशा प्रकारचा पुरावा मिळणे आवश्यक असेल.

➢ सदरची यादी सूचना अनुसूचित जाती, मुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.

..तर असा बदल करण्याची जरांगे यांची मागणी

➢ कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सग्यासोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत, असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

➢ कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्य अंतर्गत झालेल्या स्वजातीय विवाहतून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून, सदर विवाह सोहजाती आहे या संदर्भातील पुरावा देणे तथागृह चौकशीत अशा प्रकारचा पुरावा मिळणे आवश्यक असेल.

➢ सदरची यादी सूचना अनुसूचित जाती, मुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.

2 thoughts on “सर्वात मोठी बातमी! सगेसोयरे शब्दाबाबतचा ‘मसुदा’ आजची बातमीच्या हाती; पाहा संपूर्ण मुद्दे…”

Leave a Comment