मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर; कसा असेल दौरा?

Manoj Jarange Patil : (manoj jarange mumbai route) मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना येत्या 20 जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. मराठ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना रजा टाका आणि मुंबईच्या दिशेने मिळेल ते वाहन घेऊन शांततेने चला असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला मोर्चा काढण्याच्या आंदोलनाचा संपूर्ण टाईम टेबल जाहीर झाला आहे. या कार्यक्रमात कोणत्या तारखेला नेमके काय करायचे याची विस्तृत माहीती आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून जाहीर केली आहे.

20 जानेवारी 2024
🕘 सकाळी 9.00 – अंतरवाली सराटीपासून पदयात्रा सुरु
🍱 दुपारचे भोजन – कोळगाव, ता. गेवराई
😴 रात्री मुक्काम – मातोरी, ता. शिरूर

🗓️ 21 जानेवारी 2024
🍱 दुपारचे भोजन – तनपुरवाडी, ता. पाथर्डी
😴 रात्री मुक्काम – बाराबाभली (करंजी घाट)

🗓️ 22 जानेवारी 2024
🍱 दुपारचे भोजन – सुपा
😴 रात्री मुक्काम – मातोरी, ता. शिरूर

🗓️ 23 जानेवारी 2024
🍱 दुपारचे भोजन – कोरेगावं भीमा
😴 रात्री मुक्काम – चंदननगर (खराडी बायपास) पुणे

🗓️ 24 जानेवारी 2024
पुणे शहर – जगताप डेअरी – – डांगे चौक – चिंचवड – देहूफाटा
😴 रात्री मुक्काम – लोणावळा

🗓️ 25 जानेवारी 2024
🍱 दुपारचे भोजन – पनवेल
😴 रात्री मुक्काम – वाशी

🗓️ 26 जानेवारी 2024
👣चेंबूर वरुन पदयात्रा –

🏟️ आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होणार असा पूर्ण असेल दिनक्रम
👣 सकाळी पदयात्रा दुपारी 12 पर्यंत असेल
🚗 त्यानंतर आपल्या वाहनाने प्रवास करून मुक्कामाच्या ठिकाणी पोहचणे..

मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या सोबत खाण्या पिण्याच्या वस्तू  घ्यायच्या आहेत, आपण एकटे निघणार आहे, मग सोबत एक लाख असो की एक कोटी. आपण रोज पायी बारा वाजेपर्यंत चालायचे आहे आणि नंतर मुक्कामी पोहचायचे आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे.  सरकारला आता वेळ द्यायचा नाही. आम्ही पुण्यात दोन दिवस आहोत आणि आम्हाला पुणे बघायचे आहे, सर्व मराठा शंभर टक्के मुंबई जाणार आहे. आंदोलनाला कोणी गाल बोट लावत असेल तर त्याला पोलिसांचा ताब्यात द्यायचे मुंबई जाताना tv वर दिसण्यासाठी कोणीही स्टंट करायचा नाही असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

manoj jarange patil timetable 20 janewari mumbai yatra

1 thought on “मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर; कसा असेल दौरा?”

Leave a Comment