मंगेश साबळे यांचा थक्क करणारा जिवनप्रवास, जो वाचून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.

Life journey of Mangesh Sable : गोरगरीब शेतकर्‍यांना विहीर मंजुरीसाठी काही शासकीय कर्मचारी लाच मागत होते, त्यांच्यासाठी डायरेक्ट पंचायत समिति पुढे गळ्यात दोन लाखांची माळ घालून पैसे उधळणारा डॅशिंग सरपंच, Viral सरपंच नावाने प्रसिद्ध असलेले, गेवराई पायगा चे सरपंच मंगेश साबळे.

Mangesh Sable

पाहायला गेले तर हे त्यांचे पहिले आंदोलन नव्हते , याधीही त्यांनी शेतकर्‍यांसाठी, गावासाठी, खेड्या-पाड्यातल्या लोकांसाठी केली होती. वीजेसाठी डीपी वर चढून केलेलं आंदोलन असेल किंवा कपडे काढून केलेलं आंदोलन असेल, वेगवेगळ्या युनिक पद्धतीने खूप जणांना मोठा फायदा या आंदोलांनाच्या माध्यमातून भेटला.

Mangesh Sable

एवढच नाही तर मराठा आरक्षणादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत, या माणसाने आपली स्वताची गाडी जाळली. मुंबईला जाऊन वकील सदावर्ते ची गाडी फोडणारा निडर सरपंच म्हणजे मंगेश साबळे. (Life journey of Mangesh Sable)

पण या धडाकेबाज सरपंचाचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे, तो वाचून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, मला अपेक्षा आहे की तुम्ही हा लेख संपूर्ण वाचसाल…

मंगेश साबळे तसे मूळचे छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे.., एका गोरगरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मंगेश साबळे, आपल्या वडिलांचे अपार कष्ट शेतात, राबराब राबणे, घाम गाळणे हे सर्व हाल अपेष्टा बघून, मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेले. मंगेश साबळे यांना वाटले आपण शिकून मोठा अधिकारी बनून आपल्या आई-वडिलांचे नाव रोशन करू, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

Mangesh Sable

मंगेश साबळे तसे मूळचे छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे.., एका गोरगरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मंगेश साबळे, आपल्या वडिलांचे अपार कष्ट शेतात, राबराब राबणे, घाम गाळणे हे सर्व हाल अपेष्टा बघून, मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेले. मंगेश साबळे यांना वाटले आपण शिकून मोठा अधिकारी बनून आपल्या आई-वडिलांचे नाव रोशन करू, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. (Life journey of Mangesh Sable)

शिक्षण घेत असताना वर्ष – दोन वर्ष उलटली आणि अचानक एके दिवशी न अपेक्षित असलेला फोन त्यांना आला.. आणि त्या फोनवर त्यांच्या आई बोलत होत्या. आईने सांगितले ” तु घरी ये, तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाही हे, ते कोणालाच ओळखत नाहीत, ते जिथे गेले तिथेच एकसारख बसून राहतात, कधी कपडे न घालताच बाहेर जातात, लोक तर त्यांना वेडे म्हणतायत.”

Mangesh Sable

मग लगेच मंगेश साबळे घरी गेल्यावर, त्यांचे वडील त्यांनाही ओळखायला तयार नव्हते. हे सर्व बघून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. उपचारासाठी मंगेश साबळे यांनी त्यांच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयात नेले असता, त्यांना कळले की त्यांचे लिव्हर खराब झाले आहे, पोटात पाणी झाले आहे आणि डॉक्टरांनी सांगितले की ते “आता फक्त पाच ते सहा महिन्यांचे पाहुणे राहिले आहे.”

हेही वाचा : – सरपंच मंगेश साबळे यांचा मोबाइल नंबर, कोण आहेत, शिक्षण किती, कुठे राहतात ?

प्रचंड असे संकट त्यांच्यावरती कोसळले, तरी पण न डगमगता त्यांनी हार मानले नाही. घरी चार एकर शेती आहे, बापाच्या डोक्यावर कर्जआहे, असे माहित असतानाही आपण शाळा शिकतो आहे, देश सांभाळण्यासाठी अभ्यास करतो आहे, पण आपल्या बापालाच आपण वाचवू शकलो नाही, तर अधिकारी बनून तालुक्यातील लोकांना आपण कसे वाचवणार ?, हे प्रशासन कसे चालवणार ?, या भावनेने त्यांनी मोठ्या हॉस्पिटल कडे धाव घेतली, लिव्हर ट्रान्स प्लांटेशन होत हे त्यांना कळले, पण त्यासाठी 40 लाख रुपये त्यासाठी खर्च होता. तो त्यांच्यासाठी खूप मोठा होता. एवढे पैसे आणायचे कुठून ?

Mangesh Sable

मग त्यांनी प्रयत्न सुरू केले. CM फंड, PM फंड च्या फायली केल्या. पुण्याच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये वडिलांना ऍडमिट केलं. पण एक प्रश्न असा होता की, लिव्हर देत असताना लिव्हरचा डोनर सुद्धा हवा असतो आणि हॉस्पिटलमध्ये वर्षातून कधीतरी एखादं लिव्हर कोणीतरी दान करायचे, पण त्यावेळी हॉस्पिटलमध्ये लिव्हर उपलब्ध नव्हते. म्हणून कुटुंबातूनच लिव्हर डोनेट करावं लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या आई, ताई किंवा त्यांनाच ते डोनेट कराव लागेल, पण आपल्या आईला, ताईला त्यांना आजारी करायचे नव्हते. आपल्या बापासाठी आपण स्वतः लिव्हर डोनेट करणार, असा प्रचंड मोठा निर्णय त्यांनी घेतला. (Life journey of Mangesh Sable)

मंगेश साबळेंनी मित्रांकडून 2-5 लाख रुपये उसने घेतले, एकरभर शेती विकली, 12-15 लाख रुपये जमवले, नातेवाईकांकडून 3-4 लाख रुपये जमवले, CM-PM फंडाच्या फायली केल्या, नंतर वडिलांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. ऑपरेशन साठी 35 लाख रुपये लागणार होते, तोपर्यंत त्यांच्याकडे 25 लाख रुपये जमा झाले होते. परंतु तेथे गेल्यावर कळले की CM-PM फंडातून काही निधी येणार होता, तो निधीच अजून आला नाही. डॉक्टरांनी चौकशी केली असता, त्यांच्या लक्षात आले की, ती फाईलच अजून मंत्रालयात गेलेली नाही. परत त्यांनी वडिलांचा डिस्चार्ज घेतला, घरी आले.

हेही वाचा : – मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास

ग्रामपंचायत पासून ते मंत्रालयात वारंवार चकरा मारल्या, त्यावेळेस जो त्रास त्यांना झाला, तिथूनच त्यांना प्रशासनाची चीड आली. शासन सांगत होते की, आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये देऊ, 6 लाख रुपये देऊ, पण ते देत का नाही ?, हे बघण्यासाठी त्यांनी वारंवार चक्रा मारल्या, यामध्येच त्यांचे 6 महिने निघून गेले आणि मग परत एवढे करून सुद्धा काहीच हालचाली झाल्या नाहीत. (Life journey of Mangesh Sable)

Mangesh Sable

हेही वाचा :- मनोज जरांगे पाटील मोबाइल नंबर, कोण आहेत ?, शिक्षण किती, कुठे राहतात ?

एक सुशिक्षित तरुण असून सुद्धा त्यांना त्याचा लाभ भेटला नाही, मग त्यांनी डायरेक्ट कलेक्टर ऑफिस समोर, एक नाही, दोन नाही, सलग पाच दिवस बिगर अन्न-पाण्याच्या उपोषणाला बसले. तरी त्याचा काहीच फायदा झाला नाही. पाचव्या दिवशी संध्याकाळी पोलीस आले, पोलिसांनी त्यांना गाडीत टाकलं, घाटीला घेऊन गेले, सलाईन लावलं आणि तिथेच त्यांना सोडून दिले.

पण हार मानेल ते शेतकऱ्याचे रक्त कुठलं, तिथून ते उठले आणि दुसऱ्याच दिवशी टीव्ही सेंटरचा रस्ता धरला. टीव्ही सेंटरच्या टावर वर चढून, डायरेक्ट तिसऱ्या टप्प्यावर जाऊन बसले. काही मान्यवर जमा झाले. त्यांना त्यांची दया-माया आली. त्यांनीच त्यांचे 2-5 लाख रुपये जमा केले, ते घेऊन ते परत हॉस्पिटल ला गेले. लिव्हर प्लांटेशन ची सर्जरी त्यांनी यशस्वी करूनच दाखवली.कदाचित त्यांच्या तालुक्यातील-जिल्ह्यातील ती पहिलीच लिव्हर प्लांटेशन सर्जरी होती. एक सुशिक्षित तरुण असताना त्यांनी त्यांच्या वडिलांचा पंधरा वर्ष जीव वाचवला, त्यांचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

Mangesh Sable

सगळं चांगलं सुरू होतं, पण अचानक कोरोना आला, लॉकडाऊन लागले आणि पुन्हा त्यांच्या वडिलांची अचानक तब्येत खालावली. कडक लॉकडाऊन असताना, त्यांनी त्यांच्या वडिलांना सिग्मा हॉस्पिटल ला दाखल केले, खिशात एक-दीड लाख रुपये होते, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना ठेवले, नंतर इलाज होत नाही म्हणून सोडून दिले.

नंतर मंगेश साबळे यांनी गावाकडे फोन करून, काही पैसे मागवून, ॲम्बुलन्स घेऊन थेट पुण्याला आपल्या वडिलांना घेऊन गेले. जिथे पहिले ऑपरेशन झाले होते तिथे गेले. डॉक्टरांच्या पाया पडले, एमजी नंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. कोरोंना चालू असल्यामुळे, पेशंट सोबत नातेवाईकांना झोपून देत नव्हते, म्हणून वाचमन जाईपर्यंत ते बाथरूम मध्ये लपून बसायचे, नंतर ते गेल्यावर, पायरीवर झोपायचे, कुठेतरी जेवण करायचे, नंतर वडिलांना भेटून यायचे. असा हा महिनाभर संघर्ष त्यांनी झेलला. (Life journey of Mangesh Sable)

एवढं सर्व करून सुद्धा आपला बाप आपल्या हातातून जातो की काय, याचा चटका कुठेतरी त्यांना होता. त्यांच्या वडिलांची किडनी फेल झाल्या, फुप्फुस फेल झाले, पूर्ण शरीरात पाणी झालं. “4 दिवस व्हेंटिलेटर वर तुमचे वडील वाचतील, ते व्हेंटिलेटर काढलं तर लगेच वडील जातील आणि व्हेंटिलेटर चा रोजचा खर्च 80 हजार रुपये एवढा होता आणि मागचे आधीचेच बिल 9 लाख रुपये झाले आहे, ते भरल्याशिवाय तुम्हाला वडिलांना येथे ठेवता येणार नाही,” असे डॉक्टरांनी त्यांना ठणकावून सांगितले.

Mangesh Sable

त्यावेळेस त्यांच्याकडे मात्र कुठलाच पर्याय शिल्लक उरला नव्हता, आता करायचं काय ? एवढ्या दूरवर आलेले असताना त्यांच्याकडे मागे जायला रस्ता सुद्धा बाकी नव्हता,

चार दिवसानंतर वडिलांचे हृदय थांबणार, हे माहिती असून सुद्धा पैशाच्या अभावी त्यांनी तिथून सुट्टी घेतली. बिल करायला कॅशियर कडे गेले असता, त्यांच्या खिशात फक्त 20 हजार रुपये होते, कॅशियरने 20 हजार रुपये फक्त ॲम्बुलन्सचाच खर्च सांगितला, त्यांचे नऊ लाख रुपये बिल झाले होते, पैसे भरल्याशिवाय ते त्यांच्या वडिलांना सोडतहि नव्हते.

मंगेश साबळेंनी डॉक्टरांना हात जोडले, त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू अनावर झाले, ते बघून डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्यासाठी सांगितले. सोबत एकच ऑक्सिजनचा टँक दिला जो फक्त तासभर पुरेल, अर्ध्या रस्त्यात त्यांचे वडील ठेवलेला तो टेबल हलायला लागला होता, तो ऑक्सिजन संपला होता, तो बाकडा जोरजोरात हलत होता, ते त्यांच्या वडिलांकडे बघत होते, वडिलांच्या दोन्ही डोळ्यातून धारा येत होत्या आणि त्यांचा जीव निघून जात होता.

Mangesh Sable

वर्षभर केलेला संघर्ष त्यांना आठवत होता. आपल्या आईला,ताईला आता काय सांगायचे ?, येताना एक जिवंत माणूस सोबत घेऊन आलेलो होतो आणि घरी जाताना एक पार्थिव घेऊन जात आहे, एक शेतकरी घेऊन जात आहे.ते घरी जाता वेळेस पाऊस जोर जोरात चालू होता, तेव्हा कोरोनाही सुरू होता, म्हणून आपल्या बापाला त्यांना घरीही नेता आले नही, दारापर्यंत सुद्धा नेता आले नाही, जसे नेले तसेच सरणावर ठेवले आणि पेटवून दिले. साबळे यांचे वडील शेती करायचे, ते वयाच्या 42 व्या वर्षी मरण पावले. (Life journey of Mangesh Sable)

आणि मंगेश साबळे तसे मूळचे छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे .. . ही कहाणी आहे मंगेश संजय साबळे यांची. तिथून त्यांनी ठरवलं की त्यांची अशी अवस्था आहे तर कित्येक मंगेश साबळेंची अशी अवस्था असेल आणि मग तिथूनच पुढे शेतकऱ्यांसाठी लढायचं, उरलेल आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित करायचं या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली.

Mangesh Sable

एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आज संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेऊन फिरवत आहे. मंगेश साबळे जे काही काम करतात, त्याचा जनतेला, तरुणांना आदर्श वाटतोआहे. त्यांच्या मते, मुळात हा आदर्श नसून प्रत्येक गावातल्या प्रत्येक सरपंचाने असे काम करायला हवे. खरंतर हे काम नसून हे त्यांचे कर्तव्य आहे, प्रत्येक सरपंचाने त्यांची 50% जरी काम केले तरी तो सरपंच सर्वांचा आदर्श बनू शकतो. (Life journey of Mangesh Sable)

हेही वाचा : – सरपंच मंगेश साबळे यांचा मोबाइल नंबर, कोण आहेत, शिक्षण किती, कुठे राहतात ?

हा सर्वसाधारण सरपंच, गोरगरीब शेतकर्‍याचा मुलगा. आज उभा आहे लोकसभेसाठी, खासदारकीची निवडणूक लढवतोय.

तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा, जितकं शेअर करता येईल तितकं करा आणि असेच नवनवीन लेख बघण्यासाठी आमच्या व्हाट्स अप ग्रुपला जॉइन करा.

1 thought on “मंगेश साबळे यांचा थक्क करणारा जिवनप्रवास, जो वाचून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.”

Leave a Comment