मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

वाशीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक, चारही बाजूने किमान काही लाख लोक, गर्दीच्या मध्यभागी एक कार आणि त्या कारच्या टपावरती बसलेला एक माणूस, त्या माणसाच्या एका आवाजावर गर्दी शांत व्हायची, उन्हा-तान्हात तासभर उभे राहायची, उत्साहाने उसळायची, त्याच वाशीच्या चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. तेव्हाही एका माणसाचं नाव पुकारल्यावर प्रचंड जल्लोष झाला, उपोषण सुटण्याचे वाट बघत असणाऱ्या प्रत्येकाने आनंद साजरा केला आणि गर्दीतून आवाज यायला लागला “एकटा माणूस लढला”, “एकट्याने सगळ्या खूट्या उपटल्या”, “आरक्षणासाठी लढायला एकटा माणूस बस” अर्थात तो माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील. (History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil)

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

ऑगस्ट महिन्यात मराठा आरक्षणाची हाक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी 5 महिन्यात आंदोलन तडीस नेलं. जालन्याच्या अंतरवाली सराटी मधून सुरू झालेल्या उपोषणाने मुंबईत आलेल्या मराठा बांधवांच्या विराट मोर्चाचे रूप घेतले. वाशीच्या सभेत मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अध्यादेश मिळाल्याशिवाय मुंबई सोडत नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी जोर कायम ठेवला. 27 जानेवारीच्या पहाटे अध्यादेश निघाल्यानंतर सकाळी मुख्यमंत्री शिंदे च्या उपस्थितीत विजय उत्सव साजरा केला. त्यांच्या या आंदोलनामुळे तीन कोटी मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात जायचा मार्ग मोकळा झाला. (History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil)

जरांगे पाटलाचा हा आहे इतिहास

आरक्षणाच्या प्रश्नावर सगळ्या खुट्या उपटणाऱ्या, एकटे लढणाऱ्या जरांगे पाटलाचा हा इतिहास – जालन्याच्या अंकुश नगर मध्ये साखर कारखान्याच्या जरा पुढे गेले की एक धुळीने माखलेला रस्ता आहे, त्याच रस्त्याला एका लाईनीत बैठी घरे आहेत. त्यातलाच एक दोन खोल्यांचं घर कायम चर्चेचा विषय असतो.

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

एक छोटा हॉल आणि त्याला लागून असलेल्या एक स्वयंपाक घर. हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो, मुर्त्या, दोन साध्या खुर्च्या आणि तीन माणसं खेटून बसतील असा सोपा. बाकींचेच्या घरासारखंच असलं तरी प्रत्येकाच्या ओळखीच आहे कारण याच घरात राहतात मनोज जरांगे पाटील.

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते जालन्यातल्या अंबड मध्ये आले. तिथं एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. वेटर असले तरी त्यांच्या कामाची शिस्त आणि लोकांना मदत करायची ओढ यामुळे मनोज जरांगे पाटील येणाऱ्या जाणाऱ्या कित्येकांचे लक्ष वेधून घ्यायचे. चर्चा व्हायची आणि समाजकार्याची ओढ जरांगेंना स्वस्त बसून द्यायची नाही. त्यांनी राजकारणाची वाट पकडली. काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि कामाचा धडाका बघून त्यांना युवक काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष पद ही मिळालं. पण जरांगे पाटील पक्षीय राजकारणात फार काळ राहिले नाही. 2003 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्याचे कारण ठरले जेम्स लेन प्रकरण. या प्रकरणात पक्षाने घेतलेल्या भूमिका मान्य नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस सोडली.(History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil)

हेही वाचा : – मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी विचारले जाणार हे 154 प्रश्न

त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या संघटनेने मोर्चे काढले, आंदोलने केली. 2014 मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठीच छत्रपती संभाजी नगर च्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला भव्य मोर्चाही चर्चेचा विषय ठरला होता.

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

2016 मध्ये मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या नगद नारायण गडावर 500 फुटी भगव्या ध्वजाची उभारणी केली. कार्यक्रमाला वेगवेगळ्या मठाधीपतींनी उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. पण बारीक शरीरयष्टी, कपाळावर उभ कुंकू, आणि गळ्यात भगव उपरणं अशा रूपातले मनोज जरांगे पाटील लोकांचे ओळखीचे झाले. त्या आंदोलनांमुळे त्यांनी पहिल गाजलेलं आंदोलन केलं 2012-13 मध्ये. ते आंदोलन होते पाण्यासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यांमधून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्यासाठी त्यांनी 2016 मध्ये प्रचंड जोर लावला. (History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil)

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

मंग 2016 मध्ये कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर आंदोलनाची हाक दिली. या प्रकरणातील आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना मारहाण करण्यात आली होती. ती मारहाण जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात चार जणांना अटक ही करण्यात आली.(History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil)

पुढे जेव्हा मराठा क्रांती मोर्चा निघाला, तेव्हा मुंबईत निघालेल्या मोर्चा वेळी त्यांनी मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि मुंबईला नेलं. मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे त्यासाठी ते इतके आक्रमक होते की आंदोलनात कमी राहायला नको म्हणून त्यांनी आपली जमीनही विकली असे स्थानिक पत्रकार सांगतात. मराठा क्रांती मोर्चा वेळी आरक्षणाच्या मुद्द्याने जसा जोर पकडला होता तो नंतरच्या काळात काहीसा ओसरला. शासनाच्या समित्या, वेगवेगळे अहवाल, निर्णय आणि कोर्टाचे निकाल या सगळ्यात हा प्रश्न अडकला.

राज्याच्या राजकारणात आरक्षणाची चर्चा मागं पडली असली तरी मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आरक्षणाच्या मुद्द्याला जराही ढील दिली नव्हती. त्यांनी 2021 मध्ये साष्ट पिंपळगाव मध्ये ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन नुसतं चर्चेत येण्यापुरतं नव्हतं, कारण ते दोन-तीन दिवस नाही, तर तब्बल 90 दिवस म्हणजेच दीड महिने चालले. जेव्हा वेगवेगळ्या मागण्या मान्य झाल्या तेव्हाच जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतले. (History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil)

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

त्याच वर्षी त्यांनी मराठा बांधवांसाठी आणखी एक आंदोलन केलं ते सुद्धा यशस्वी करून दाखवलं. गोरी गंधारी येथे झालेल्या या आंदोलनात त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत पावलेल्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून दिली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचं हा त्यांचा पॅटर्न कायम ठेवला.

हेही वाचा :- मनोज जरांगे पाटील मोबाइल नंबर, कोण आहेत ?, शिक्षण किती, कुठे राहतात ?

मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत ते अनेक आंदोलनांचा चेहरा ठरले. मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर प्रखरतेने मुद्दे मांडू लागले. आंदोलन शेतकऱ्यांसाठीच असेल किंवा मराठा समाजासाठी, त्यांच्या मागं लोकांचं बळ उभं राहू लागलं.

ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण संदर्भात एक बैठक बोलावली होती. मंत्री, आमदार आणि मराठा संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सगळेजण मुख्यमंत्र्यांसमोर आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होते, तेव्हा एका व्यक्तीचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. ती व्यक्ती होती मनोज जरांगे पाटील.

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

पण यामुळेही मनोज जरांगे पाटील मागे हटले नाही. वर्षभराने म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये पुन्हा आंदोलन सुरू केले. यावेळी उपोषणाचा मार्ग पकडला आणि त्यांच्या उपोषणात झालेल्या लाठीचार्ज मुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पासून शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे अशा कित्येक नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं.

सरकारने काही मागण्या मान्य केल्या तरी मूळ मागण्याचा हट्ट कायम ठेवत, त्यांनी पुन्हा एकदा उपोषण, महाराष्ट्र दौरे, असे आंदोलनाचे टप्पे बदलले. मंग 20 जानेवारीला आंतरवाली सराटी मधून मुंबईला जाणार अशी हाक दिली. सात दिवस सगळ्या महाराष्ट्राने जरांगे पाटलांच्या नेतृत्वात निघालेली पायी दिंडी पाहिली. प्रत्येक टप्प्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, काही कोटी मराठा बांधवांची उपस्थिती आणि या सगळ्यात मुंबईच्या वेशीवर मराठा बांधव पोहोचले. (History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil)

हेही वाचा :- सर्वात मोठी बातमी! सगेसोयरे शब्दाबाबतचा ‘मसुदा’ आजची बातमीच्या हाती; पाहा संपूर्ण मुद्दे…

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

मग छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाडीच्या टपावर उभे राहून मनोज जरांगे पाटलांनी सरकारचा जीआर वाचून दाखवत आंदोलन यशस्वी झाल्याची माहिती दिली. पण तरीही अध्यादेशासाठीचा जोर कायम ठेवला आणि अध्यादेश घेऊन 27 जानेवारी च्या सकाळी त्याच चौकात छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून विजयाची हाक दिली. (History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil)

History of Maratha Reservation Leader Sangharshayoddha Manoj Jarange Patil

समोर जमलेली लाखो मराठा बांधवांची गर्दी एका माणसाला डोळ्यात साठवत होती. आरक्षणासाठी एकट्याने लढणारा, कित्येक अडचणींना पुरून उरून खुट्या उपटणारा, मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. मराठ्यांच्या इतिहासात मनोज जरांगे पाटील यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल .

हा लेख तुम्हाला कसं वाटला Comment करून नक्की सांगा आणि इतरांना देखील share करा.

धन्यवाद…!

1 thought on “मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास”

Leave a Comment