कढीपत्त्याचे ‘हे’ सर्वोत्तम उपाय तुमच्या केसांना बनवतील घनदाट आणि काळेभोर; आजच वापरून पाहा..!

🌿 कढीपत्त्याचे ‘हे’ सर्वोत्तम उपाय तुमच्या केसांना बनवतील घनदाट आणि काळेभोर; आजच वापरून पाहा..!

Health Tips Best 7 benefits of curry leaves : आपले केस लांबसडक, दाट दिसावेत असं प्रत्येकाला वाटते. आजकाल खाण्यापिण्यातील चुका, प्रदूषण, खराब जीवनशैली, ताण-तणाव आणि चुकीच्या उत्पादनांच्या वापरामुळे केस फारच गळतात. केस वाढत नसतील तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. 

🙆🏻‍♀️ केस वाढवण्याासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कढीपत्त्याचा वापर करू शकता. कढीपत्ता आपल्या आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरतो. यात व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, प्रोटीन आणि एंटीऑक्सिडेंट्स यांसारखी पोषक तत्व असतात. यामुळे केस वाढवण्यास मदत होते. केसांना कढीपत्ता लावल्यास केस गळणं कमी होऊन केस दाट, चमकदार बनतात._ 

3️⃣ केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्त्याचा वापर ३ प्रकारे करू शकता.

 🌿+🍈 कढीपत्ता आणि आवळा – 

     केसांना लांबसडक बनवण्यासाठी तुम्ही कढीपत्ता आणि आवळ्याचा हेअर मास्क लावू शकता. यासाठी एक आवळा मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यात १ चमचा कढीपत्त्याची पेस्ट मिसळा नंतर ही पेस्ट आपल्या केसांवर लावा जवळपास १ तासासाठी असंच राहू द्या नंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावा यामुळे केस लांब आणि दाट होतील.

 🌿+🥥 कढीपत्ता आणि नारळाचे तेल – 

    केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्ता नारळाच्या तेलात मिसळून लावू शकता. यासाठी एका पॅनमध्ये नारळाचे तेल घ्या त्यात ७ ते ८ कढीपत्ता घालून उकळून घ्या. त्यानंतर मिश्रण थंड करून घ्या आणि स्काल्प आणि केसांना लावून मसाज करा. जवळपास १ तासाने केस माईल्ड शॅम्पूने स्वच्छ धुवा.

हेही वाचा : २२ व्या वर्षी सुरू केला बिझनेस अन् २६ व्या वर्षी बनला अब्जाधीश, आज ‘या’ मुलाच्या आवतीभोवती १५०० कर्मचाऱ्यांचा गराडा

 🌿+☘️ कढीपत्ता आणि मेथी –  

    केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्ता आणि मेथीचा वापर करू शकता. यासाठी १० ते २० कढीपत्त्याची पानं घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्या. यात २ चमचे मेथीची पावडर मिसळा त्यानंतर केसांना लावा. जवळपास ३० मिनिटं तसंच ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केस लवकरच लांब आणि दाट होण्यास मदत होईल.

🙏🏻 कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा…

1 thought on “कढीपत्त्याचे ‘हे’ सर्वोत्तम उपाय तुमच्या केसांना बनवतील घनदाट आणि काळेभोर; आजच वापरून पाहा..!”

  1. I’m grateful. I have been searching for information about this topic for a while, and yours is the best that I have discovered thus far. However, what about the revenue? Regarding the supply, are you sure?

    Reply

Leave a Comment