Gay gotha anudan yojana 2023 – गाय म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी मिळणार 80 हजार अनुदान

जनावरांचा गोठा अनुदान | Gai Gotha Anudan Yojana | गाई गोठा योजना | gotha yojana | गुरांचा गोठा | Gay Gotha Anudan Yojana | Gay Gotha Yojana | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2021 | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 | गाय गोठा योजना | Gai Gotha Yojana | गुरांचा गोठा योजना | Gotha Shed Yojana | गाय पालन मराठी | गाई म्हशी गोठा योजना | शरद पवार ग्राम समृद्धी योजना | Sharad Pawar Gram Samridhhi Yojana | शरद पवार गाय गोठा योजना | Gai Gotha Yojana 2022 | म्हैस पालन माहिती | गाय म्हैस पालन योजना 2023 | Sharad Pawar Gotha Yojana    

नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या पोस्टमध्ये गाय गोठा अनुदान योजना 2023 : शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे आणि याबद्दलची पूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण या आजची बातमी या मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत तुम्हाला देत आहोत.

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते.जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा.महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Gai Gotha Anudan Yojana आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.

Gai Gotha Anudan Yojana – गाय गोठा अनुदान योजना

आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर  जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय,म्हशी,शेळी,कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.

विशेष सूचना: आम्ही गाय गोठा अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे, त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा, जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी व पशुपालक असतील जे गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावगाय गोठा अनुदान योजना
योजनेची सुरुवात ३ फेब्रुवारी २०२१
विभागकृषी विभाग
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीमहाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी
लाभजनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान
योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

गाय गोठा योजनेचा उद्देश काय आहे ?  – Maharashtra Gai Gotha Anudan Yojana Purpose ?

 • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
 • शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
 • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख उद्देश्य आहे.
 • शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
 • शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.
 • शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
 • नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा एक उद्देश्य आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्टये काय आहे ? – Gai Gotha Anudan Yojana Maharashtra Features?

 • महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोंघांची बचत होईल.
 • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
 • गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
 • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

गाय गोठा योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान – Gotha Yojana Subsidy

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे संपूर्ण माहिती – Cow and buffelo shed all information

आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आणि म्हैशी असतात कारण गाई आणि म्हशी पालन हा शेतकऱ्यांना पारंपरिक आणि शेतीसाठी जोडव्यवसाय आहे परंतु गाई-म्हशींसाठी निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते तसेच जनावरांना ठेवण्यात येणारी जागा खडबडीत व आबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते.

ग्रामीण भागातील गोठे कच्चे बांधले जातात.जनावरांचे शेण व मूत्र साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे ते गोठ्यात इतरत्र पडलेले असते.तसेच पावसाळ्यात जमिनीला दलदलीचे स्वरूप प्राप्त झालेले असते.याच जागेत जनावरे बसत असल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे आजार होतात.

त्यामुळे काही जनावरांना स्तनदाह होऊन हजारो रुपये खर्च करावे लागतात काही वेळेस गाई म्हशींची कास निकामी होते.अस्वच्छतेमुळे जनावरांच्या खालील बाजूस जखमा देखील होतात.बऱ्याच ठिकाणी गोठ्यामध्ये जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी सुद्धा बांधलेली नसतात.जनावरांना मोकळ्या जागेत चारा टाकला जातो या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्यामुळे जनावरे तो चारा खात नाहीत व चारा वाया जातो.

गोठयातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण यांचा साठा न करता आल्यामुळे ते मोठया प्रमाणावर वाया जाते.जनावरांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठयातील जागा ही सिमेंट काँक्रीटचा वापर करुन पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मूत्र व शेण गोठयाशेजारील खडडयामध्ये एकत्र जमा.करुन त्याचा शेतजमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करुन घेता येईल.तसेच गव्हाणी बांधून गुरांना त्याचा चारा खाण्यासाठी उपयोग होईल.

 • या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान दिले जाईल.
 • ६ पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच १२ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
 • १२ पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच १८ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.
 • गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असेल
 • गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.
 • जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात येईल.
 • सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.

शेळी पालन शेड बांधणे ?- Bakri / Goat Shed?

शेळीला गरीबाची गाय समजली जाते.शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजिवीकेचे पारंपरिक आणि महत्वाचे साधन आहे.अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेळीपालन या व्यवसायाकरिता मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील शेळी मेंढी पालनावर उदरनिर्वाह करणारी गोरगरीब कुटुंबे पैशाअभावी शेळया-मेंढयाना चांगल्या प्रकारचा सरंक्षित निवारा देऊ शकत नाहीत.चांगल्या निवाऱ्याअभावी शेळया मेंढयामध्ये विवीध प्रकाराचे संसर्गजन्य, जंतजन्य, बाहयपरजीवी किटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगग्रस्त, खुरटी व आर्थिकदृष्टया फारशी किफायतशीर नसलेल्या शेळया-मेंढयाचे कळप पाळले जातात. याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटूंबास नरेगा योजनेअंतर्गत शेळीपालन शेड बांधणे हे काम उपलब्ध करुन देण्यात येते. \

ग्रामीण भागामध्ये शेळया-मेंढयापासून मिळणारे शेण, लेंडया व मूत्र यापासून तयार होणा-या उत्कृष्ठ दर्जाच्या सेंद्रीय खतांचा पक्क्या स्वरुपाचे व चांगले गोठे नसल्याने नाश होतो. शेळया-मेंढयाकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल,मूत्र एकत्र करुन शेतीमध्ये उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल.यामुळे शेतीच्या सुपिकतेबरोबरच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकेल.

प्रत्येक शेतकऱ्याकडे २ ते ३ शेळ्या असतातच परंतु त्या २ ते २ शेळ्यांसाठी शेतकऱ्याला स्व-खर्चातून शेड बांधणे परवडण्यासारखे नसते या गोष्टीचा विचार करून शासनाने २ ते ३ शेळ्या असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्याचे ठरविले आहे

 • या योजनेअंतर्गत १० शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी ४९२८४ – रुपये अनुदान देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत २० शेळ्यांसाठी दुप्पट आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाते.
 • शेळीसाठी बांधण्यात येणारी शेड सिमेंट व विटा लोखंडे सळ्यांच्या आधाराने बांधण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत एका कुटुंबात जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरीता 3 पट अनुदान मंजूर करण्यात येते.

महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा

कुकूट पालन शेड बांधणे ? – Kukkutpalan Shed Bandhane?

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी शेती सोबत कुकूटपालनासारखा जोड व्यवसाय सुरु करतात.

कुक्कुट पालनामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना पूरक उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक प्राणीजन्य प्राथिनांचा पुरवठा होतो. खेडेगावामध्ये कुक्कूटपक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते.

कुक्कूटपक्ष्यांचे उन,पाऊस, परभक्षी जनावरे व वारंवार येणा-या आजारांपासून सरंक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

चांगल्या निवा-यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे, पिल्लांचे व अंडयाचे परभक्षी प्राण्यांपासून सरंक्षण होण्यास मदत होईल

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन,

वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.

तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटूंबाना प्राधान्य देण्यात येईल.

योजनेअंतर्गत १०० पक्ष्यांकरिता ७.५० चौ.मी.शेड बांधण्यात येईल तसेच त्याची लांबी ३.७५ मी. आणि रुंदी २.० मी.असेल

लांबीकडील बाजूस ३० सेमी उंच व २० सेमी जाडीची, विटांची जोत्यापर्यंत भिंत बांधण्यात येईल तसेच छतापर्यंत कुक्कूट जाळी ३० सेमी X ३० सेमीच्या खांबानी आधार दिलेली असेल.

आखूड बाजूस २० सेमी जाडीची सरासरी २.२० मीटर उंचीची भिंत असेल. छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात येईल.

छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरण्यात येतील. तळयाच्या पायासाठी मुरुमाची भर घालण्यात येईल त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा १ : ६ प्रमाण असलेला मजबूत थर असेल

पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यासाठी शेळयांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात येईल

या योजनेअंतर्गत छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात येईल छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे/सिमेंटचे पत्रे वापरण्यात येतील. तळासाठी मुरुम घालण्यात येईल.

 • या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने १०० पक्षांकरिता शेड बांधण्यासाठी रुपये ४९७७०/- अनुदान देण्याचे ठरविले आहे या शेडमध्ये १०० पक्षी सांभाळणे शक्य होईल.
 • जर लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या १५० च्या वर नेल्यास शेडसाठी दुप्पट अनुदान देण्यात येईल
 • जर एखाद्याकडे १०० पक्षी उपलब्ध नसल्यास त्याने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर २ जमीनदारांसह शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० पक्षी आणणे लाभार्थ्यास बंधनकारक राहील.

भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग – Bhu sanjivini nadep composting ?

भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग बांधकामासाठी १०५३७/- रुपये दिले जातात.

जमिनीच्या आरोग्यात सुधारणा केल्यास कृषी उत्पादनात मोठया प्रमाणावर भर पडू शकते.

शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगव्दारे प्रक्रीया केल्यास त्यातील सेंद्रीय पदार्थ जैविक पध्दतीने, सूक्ष्म जीव तसेच गांडुळाव्दारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्यूमस सारखे सेंद्रीय कंपोस्ट खत तयार होते.

या खताचा वापर शेतात मोठया प्रमाणावर केल्यास जमिनाच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात मोठी भर पडू शकते.

अशा सेंद्रीय पदार्थात सर्वच प्रकारचे सूक्ष्म जीव मोठया प्रमाणावरअसतात. योग्य परिस्थितीत या सूक्ष्म जीवांची संख्या वाढते आणि हे मोठया संख्येत असलेले सूक्ष्मजीव सेंद्रीय पदार्थांचे विघटन झपाटयाने करतात.

नाडेप कंपोस्टिंग अंतर्गत ३.६ मी X १.५ मी X ०.९ मी आकाराचे जमिनीवरील बांधकाम करण्यात येईल.

त्यापासून साधारणत: २ ते २.२५ टन कंपोस्ट खत ८० ते ९० दिवसांत तयार होईल. हे खत ०.२५ हेक्टर क्षेत्रास पुरेसे आहे. शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांपासून सेंद्रीय खत तयार करुन, परत

शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंद्रीय खतांमुळे जमिनीचा कस व जलधारण शक्ती वाढून पोषक

द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभूशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. नाडेपच्या बांधकामातील चारही भिंतीत छिद्रे ठेवली जातात.

जेणेकरुन त्यातून हवा खेळती राहून सेंद्रीय पदार्थांचे विघटन होण्यास, कुजण्यास चालना मिळते.

नाडेपचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यात सेद्रीय पदार्थ / कचरा, शेण, माती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. साधारणत: पहिल्या थरात १०० किलो कचरा तळात रचला जातो तो अंदाजे ६ इंच उंचीचा असतो. ४ किलो गायीचे शेण १२५ ते १५० लिटर पाण्यात मिसळून पहिल्या थरावर शिंपले जाते. हंगामातील तापमानानुसार पाणी कमी-जास्त लागते. या शेण पाण्याचा दुस-या थराच्या वर खडे, काच, इत्यादी विरहीत गाळलेली स्वच्छ माती (पहिल्या थरातील कच-याचे वजनाचे अंदाजे निम्मे ५० ते ५५ किलो) दुस-या थरावर पसरवली जाते त्यावर थोडे आवश्यकतेनुसार पाणी शिंपडले जाते. अशा प्रकारे एकावर एक थर नाडेप टाकीच्या टाकीच्या वर १.५ फुटापर्यंत रचून ढीग तयार केला जातो. त्यानंतर ढिगाचा वरचा थर ३ इंचचे शेण व मातीचे मिश्रणाने (४०० ते ५०० किलो) बंद केला जातो. २ ते ३ महिन्यात काळपट, तपकिरी, भुसभूशीत, मऊ, ओळसर आणि दुर्गंध विरहीत कंपोस्ट तयार होते.

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.

गाय गोठा अनुदान 2023 योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो कोणकोणते लागतील ? – Gai Gotha anidan scheme photos required?

सदर लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो

(i) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो

(ii) काम सुरू असतानाचा फोटो

(iii) काम पूर्ण झालेल्याचा फोटो व लाभार्थी सह फोटो इत्यादी

हे तीन प्रकारांमधील फोटो अंतिम देयक प्रस्ताव सोबत ७ दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.

गाय गोठा योजनेसाठी कोण पात्र आहे? – Gai Gotha Yojana Beneficiary

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

गाय गोठा योजनेचा लाभ फायदे – Gai Gotha Yojana Benefits

 • गाय गोठा योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधून देण्यासाठी अनुदान देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला शेळीपालनासाठी शेड बांधून देण्यात येते
 • लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत कुकूट पालनासाठी शेड बांधून देण्यात येते.
 • लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत भू संजीवनी नाडेप  कंपोस्टिंग साठी अनुदान देण्यात येते.
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होते
 • या योजनेमुळे गावाचा व शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होते.
 • गाय गोठा अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • गाय गोठा अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
 • गाय, म्हैस, शेळी, कुकुटपालन यांसाठी शेतकऱ्यांना शेड तसेच गोठा बांधण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी यांना राहण्यासाठी शेड तसेच गोठा उपलब्ध होईल त्यामुळे त्यांचे ऊन, वारा, पावसापासून बचाव होईल.
 • गाय गोठा योजनेअंतर्गत पुरुष शेतकऱ्यांसोबत महिला शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.

गोठा बांधणी अनुदान 2023 योजनेसाठी आवश्यक पात्रता काय हवी ?- Gai Gotha Anudan Yojana Eligibility?

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

गाय गोठा योजनेच्या अटी काय आहे ? Gay Gotha Yojana 2023 Terms & Condition

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे
 • प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
 • उपलब्ध पशूंचे जीपीएस मध्ये टायपिंग करणे आवश्यक
 • या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येईल.
 • या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल.
 • शेतकऱ्याने जर या आधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या एख्याद्या योजनेअंतर्गत गाय, म्हैस व शेळी साठी शेड बांधून घेतली असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

गाय गोठा अनुदान योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणती हवीत ? Gai Gotha Anudan Yojana Documents

 1. अर्जदाराचे आधार कार्ड
 2. रेशन कार्ड
 3. अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
 4. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 5. अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 6. अर्जदाराचे मतदान कार्ड
 7. मोबाईल क्रमांक
 8. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक (15 वर्षाच्या वास्तव्याचा दाखला असणे आवश्यक)
 9. अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा.
 10. आदिवासी प्रमाणपत्र
 11. जन्माचे प्रमाणपत्र
 12. जातीचे प्रमाणपत्र
 13. या योजनाआधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक.
 14. ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र / ना हरकत प्रमाणपत्र.
 15. ग्रामपंचायत शिफारस पत्र
 16. अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक
 17. अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक,सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक.
 18. अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक.
 19. अर्जदारांना जनावरांसाठी गोठा/शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.

गाय गोठा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ? – Gay Gotha Yojana Maharashtra Online Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या योजनेचा अर्ज Download करावा.

अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा व अर्ज सादर केल्यावर अर्जाची पोचपावती घ्यावी.

अशा प्रकारे तुमची गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

गाय गोठा योजनेअंतर्गत अर्ज कसा भरावा ? – Gai Gotha Yojana 2023 Online Apply

 • या योजनेचा अर्ज आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या पैकी कोणाकडे करत आहोत त्याच्या नावावर बरोबरची  खूण करावी.
 • त्याखाली आपल्याला ग्रामपंचायतीचे नाव, स्वतःचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे
 • अर्जदाराने स्वतःचे नाव,स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
 • अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्या समोर बरोबरची खूण करायची आहे.
 • अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
 • लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
 • लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
 • तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
 • त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
 • त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्या नुसार पोचपावती दिली जाईल.

गाय गोठा योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

Q 1. गाय गोठा बांधण्यासाठी किती अनुदान दिले जाते ? Gai Gotha bandhnyasathi kiti anudan dile jate ?

• २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधला जातो त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान दिले जाते

• १२ गुरांसाठी या योजनेअंतर्गत दुप्पट अनुदान दिले जाते.

• १८ गुरांसाठी या योजनेअंतर्गत तिप्पट अनुदान दिले जाते.

Q 2. शेळी पालन पक्की शेड बांधण्यासाठी किती अनुदान दिले जाते ? sheli palan pakki shed bandhanyasathi kiti anudan dile jail ? 

• या योजनेअंतर्गत १० शेळ्यांसाठी ४९२८४/- रुपये अनुदान दिले जाते.

• २० शेळ्यांसाठी या योजनेअंतर्गत दुप्पट अनुदान दिले जाते.

• 30 शेळ्यांसाठी या योजनेअंतर्गत तिप्पट अनुदान दिले जाते.

Q 3. कुकुट पालन शेड साठी किती अनुदान दिले जाते ? kukud palan shed sathi kiti anudan dile jail?

• १०० पक्षासाठी ४९७७०/- रुपये अनुदान दिले जाते.

• १५० पक्षांसाठी दुप्पट अनुदान दिले जाते.

Q 4. भू-संजीवनी नाफेड कंपोस्टिंग साठी किती अनुदान दिले जाते ? Bhu sanjivini nafed composting sathi kiti anudan dile jail ?

या योजनेअंतर्गत १०५३७/- रुपये अनुदान दिले जाते

Q 5. गाय गोठा अनुदान योजना कोणासाठी आहे ? – Gai gotha anudan yojna konasathi ahe ?

गाय गोठा अनुदान योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आहे.

सारांश

आशा करतो कि गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले गाय गोठा अनुदान योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Leave a Comment