अण्णासाहेब पाटील योजना – मिळणार 15 लाखांपर्यंत कर्ज – असा करा अर्ज

Annasaheb Patil Loan Online

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तसेच आपण आजची बातमी या मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या सर्वच विद्यार्थी, शेतकरी, उदयोजक मित्रांना एक अपडेट देणार आहोत तर ही बातमी सविस्तर वाचा.

       राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग व्यवसाय करता यावा. याकरिता राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळामार्फत बँकेकडून कर्ज घेऊन त्याचे नियमित परतफेड केली तर त्या कर्जाचे सव्वा चार  लाखापर्यंतचे व्याज हे आर्थिक मागास विकास मंडळ भरते. अर्थात हे कर्ज बिनव्याजी दुर्बल घटकातील तरुणांना मिळते. महामंडळाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत 4509 बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता आलेला आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा.महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे. तेच यांस पात्र राहतील.ऑनलाईन व्याज परताव्याची मागणी करताना, संबंधित लाभार्थी जास्तीत-जास्त तीन महिन्यांच्या क्लेमची मागणी करु शकतो.

अण्णासाहेब पाटील योजनेची उद्दिष्टे काय आहे ?

👉आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.

👉योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

👉आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.

बिनव्याजी कर्ज योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ?

1) शासनाने दिलेलाच जातीचा दाखला* 

2) पॅन कार्ड* 

3) रेशनकार्डची प्रत* (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य असेल.

4) आधार कार्ड *

5) उत्पन्न सर्टिफिकेट 

6) उद्योगाच्या निगडीत कागदपत्रे  

बिनव्याजी कर्ज योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

     अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालाची मदत अर्जदारांनी घेऊ नये. इच्छुक युवकांनी थेट महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून कागदपत्रे अपलोड करावेत. कोणतीही अडचण येत असेल तर तात्काळ जिल्हा समन्वय एक कार्यालयात संकल्प संपर्क साधा. 2022 पासून ही कर्ज मर्यादा पंधरा लाख रुपयांपर्यंत केली गेली आहे. या वाढलेल्या मर्यादेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेमधून लाभ घ्यावा.

                     येथे क्लिक करा 👇👇👇

               कर्जसाठी येथे करा ऑनलाइन अर्ज 

अण्णासाहेब पाटील योजनेसाठी आत्तापर्यंत किती रुपयांचे वाटप झाले ?

       अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील ४५०९ बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देऊन त्यांना सक्षम बनवले आहे. या तरुणांना विविध बँकांनी तब्बल 285 कोटी 64 लाख 98 हजार 386 इतक्या कर्जाची वाटप केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांची किंवा मध्यस्थीची कोणतीही गरज नाही असे महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन पाटील यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी  https://udyog.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावेत

🙏🏻 कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा… 

 ➖➖➖➖

Leave a Comment